आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sivsena Chief Uddhav Thackeray Rally At Nanded District Loha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री होणारच अशा थाटात ठाकरेंचे भाषण; \'दोन महिने थांबा, अपेक्षा पूर्ण करणार\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - शनिवारी लोहा येथे जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण मुख्यमंत्री
होणारच अशा थाटात झाले. मुख्यमंत्री होणे माझे स्वप्न नाही. परंतु सध्या जो भ्रष्टाचार बोकाळला, महिलांवर अत्याचार होत आहेत, अंधकारमय वातावरण आहे, त्यात लोकांना शिवसेना हाच आधार वाटतो. दोन महिने थांबा. आपली सत्ता येणारच. त्या अपेक्षा मी पूर्ण करतो, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिले.

प्रताप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच मेळावा आयोजित केला. शनिवारी उद्धव यांच्या मातोश्री स्व. मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. हे सूत्र पकडून औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, युतीची सत्ता यावी म्हणून सौ. मीनाताई ठाकरे यांनी देवाला साकडे घातले होते. आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी मी मीनाताईंना साकडे घालतो.

मुस्लिमांनाही कुरवाळले: निवडणुकीवर डोळा ठेवून उद्धव यांनी हिंदुत्ववादी असल्याचे स्पष्ट केले. परंतु हिंदुत्व म्हणजे इतर धर्माचा अनादर नाही. हे त्यांनी स्पष्ट करून मुस्लिमांनाही कुरवाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी मुस्लिमांना विरोध नाही. जे मुस्लिम पाकधार्जिणे, बांगलादेश धार्जिणे आहेत त्यांनाच आमचा विरोध आहे. जे या मातीशी इमानदार आहेत, त्यांना मिठी मारण्यासही आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले.
पवार, चव्हाणांवर टीकास्त्र
ठाकरे यांनी भाषणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. चव्हाणांच्या नशिबाचा हेवा वाटतो. रोज एका घोटाळ्यात अडकतात. चार दिवसांनी बातमी येते चव्हाणांना दिलासा. एवढा भ्रष्टाचार करूनही बाप्या मस्तच. महायुतीची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे टांगून त्यांच्या पोटातील पैसा बाहेर काढू. पवारांच्या राष्ट्रवादीला तर आता गळतीच लागली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.