आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी वेरूळला शिवभक्तांची मांदियाळी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव- श्रीक्षेत्र जातेगाव ( ता. नांदगाव ) येथील मोठ्या महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी रविवारी शिवभक्तांनी श्रीक्षेत्र वेरूळ येथील शिवालय तीर्थातून पाणी नेले. परिसरात दिवसभर भक्‍तिमय वातावरण पाहायला मिळाले. जिल्हाभरातील शिवभक्त वेरूळ येथे दाखल होत काठ्या, भोपळ्याची खरेदी करीत होते. या काठ्या सजवून भाविकांनी शिवालय तीर्थात स्नान केले. भोपळ्यात भरलेल्या पाण्याने भाविकांनी अष्टतीर्थास जलाभिषेक केला. यानंतर सजवलेल्या काठ्या व भोपळ्यांची आरती करून भाविकांनी मोठ्या महादेवाच्या दिशेने प्रस्थान केले. घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांना शिवालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
छाया : वैभव किरगत
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी होती भाविकांची गर्दी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...