Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Six Dead In Accident On Miraj Pandharpur Road

VIDEO: देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांवर काळाचा घाला, अपघातात मिनी बसचा चुराडा

दिव्य मराठी वेब टिम | Apr 21, 2017, 11:38 AM IST

सांगली-एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे .शुक्रवारी पहाटे मिरज-पंढरपूर मार्गावर मिनी बसचा अपघात झाला. त्यामध्ये 10 जण गंभीर झाले. जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सूरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजता भीषण दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुले, 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सर्वजण कोल्हापुरातील माले गावातील रहिवाशी आहेत.
पंढरपूरहून परतत असताना मिरज-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी बसने रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने मिनी बसचा पुर्ण चक्काचूर झाला आहे. त्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार असून पोलीस घटनेचा शोध घेत आहे.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended