आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला विक्रीसाठी नेत असल्याचा संशय, लातुरमध्‍ये सहाजण ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई-  लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नांदूरघाट तांडा येथील १६ वर्षांच्या मुलीला जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यासाठी एका जीपने नेत असल्याच्या संशयावरून गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १६ जून रोजी पाठलाग केला. गेवराई येथील गोर सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील पोलिसांना तत्काळ याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस चौकशी करत होते.

सदरील प्रकरणातील सहा जणांना येथील बसस्थानकाजवळ जिपमधून पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ए. टी .मालसुरे , पोलिस काॅन्सेबल राठोड व  पोलिस कर्मचारयानी ताब्यात घेतले असुन या घटने बाबत पुढील चौकशी रात्री उशिरापर्यंत  सुरू होती या वेळी घटना समजताच पोलीस ठाण्यात बंजारा समाजातील तरूणांनी मोठी गर्दी केली होती
 
बातम्या आणखी आहेत...