आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दरोडेखोर जेरबंद, तीन फरार परतूर पोलिसांची कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर - दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ जणांच्या टोळीतील सहा दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले, तर तीन जण फरार झाले. 15 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास परतूर पोलिसांनी ही कारवाई केली.
दरोडेखोरांकडून तलवार, चाकू, मिरची पूड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेली दरोडेखोरांची एक टोळी वाटूर येथे दबा धरून बसली असल्याची माहिती परतूर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक शिवनाथ व्यव्हारे यांनी सहकारी पोलिस कॉन्स्टेबल संपत जाधव, दत्तात्रय मदन, निवृत्ती शेळके, यशवंत मुंढे, शिवाजी कावले यांच्यासह वाटूर गाठले व शोधमोहीम राबवली. त्या वेळी दबा धरून बसलेल्या टोळीने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून सहा जणांना ताब्यात घेतले तर तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. सोन्यासिंग टाक, राखासिंग भोंड, दयासिंग भोंड, कुलदीपसिंग जुनी, हरदीपसिंग जुनी, जोगिंदरसिंग पटवा अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार, चाकू, मिरची पूड, केबल वायर, दोरखंड तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जानीसिंग पटवा, लखनसिंग जुनी व कर्तारसिंग पटवा हे तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. मटक्यावर छापा जालना । शहरातील गांधीनगर भागात कल्याण मटका जुगारावर छापा टाकून पोलिसांनी 570 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आहे. सूर्यकांत आसाराम धुमाळ (गांधीनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक बापूराव पाटील यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.