आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्यकर्त्या शैला लोहिया कालवश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका डॉ. शैला द्वारकादास लोहिया (73) यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मानवलोक संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मानवलोकचे संस्थापक पती डॉ. द्वारकादास लोहिया, मुले अभिजित व अनिकेत, मुलगी प्रा. अरुंधती पाटील, स्नुषा डॉ. शुभदा लोहिया असा परिवार आहे.

मानवलोक, मनस्विनी प्रकल्प व आंदोलनांशी निगडित असणार्‍या डॉ. लोहिया यांना ‘भाभी’ या नावाने ओळखल्या जात. द्वारकादास लोहिया यांच्याशी 1962 मध्ये आंतरजातीय विवाह झाला. स्वामी रामानंद तीर्थ महविद्यालयात अध्यापक, वेणुताई चव्हाण महिला कॉलेजात प्राचार्यपदही त्यांनी सांभाळले. काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.