आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराने त्रस्त बापलेक; मुलावर सोशल मीडियातून उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - फुप्फुसाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या मल्लिकार्जुन मंगुले (औसा, जि. लातूर) याने नावावरील सर्व मिळकत विकून मुंबई येथे स्वत:च्या आजारावर उपचार केले. त्यातच त्यांच्या सहा वर्षांच्या मुलालाही ब्लड कॅन्सर झाल्याने उपचारासाठी खर्च कसा उभा करणार या विवंचनेत मंगुले हे शारीरिक व मानसिक तणावाने खचले होते. दरम्यान, त्यांची दयनीय व्यथा सोशल मीडियावर मित्रांमध्ये शेअर झाल्यामुळे माणुसकीच्या नात्यातून जालन्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी ६५ हजारांची आर्थिक मदत उभी केल्याने मुलावर उपचार
होत आहेत.

आजघडीला प्रत्येकाच्या हाती मोबाइल आल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. याचा जास्तीत जास्त सकारात्मक वापर कसा करून घेता येईल, यासाठीही अनेकजण सकारात्मक कामे करीत आहेत. औसा येथील मल्लिकार्जुन मंगुले हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची (एमआर) नोकरी करतात. दोन वर्षांपासून त्यांना दुर्धर आजाराने घेरल्यामुळे ते अनेक अडचणींवर मात करत उपचार करून घेत आहेत. दरम्यान, त्यांच्या मुलालाही ब्लड कॅन्सर झाल्यामुळे त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे मंगुले हे अजूनच मानसिक तणावाखाली आले होते. मंगुले हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे विविध जिल्ह्यांत त्यांचे जाणे-येणे असायचे. त्यांच्या या प्रसंगाबाबत व्हॉटसअॅपवर माहिती शेअर झाल्यामुळे जालन्यातील मेडिकल असोसिएशन व त्यांच्या मित्रमंडळींनी ज्याच्या-त्याच्या परीने दोन दिवसांत तब्बल ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यामुळे मुलाच्या आजाराच्या उपचाराला थोडाफार आधार झाला आहे. मंगुले यांना मदतीची गरज आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, माणुसकीच्या नात्यातून जालनेकरांची आर्थिक मदत
बातम्या आणखी आहेत...