आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरच्या कार चालकाचे टेंभुर्णीत चार लाख लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोडनिंब - साेलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी (ता. माढा) येथील सोलापूर- पुणे बाह्यवळण महामार्गावर रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एक कारमधील दोघांना कोयत्याने मारहाण करून तीन लाख ८० हजारांचा ऐवज लुटून नेला. कारमधील दाेघेही लातूरचे रहिवाशी अाहेत.

कारमधील धनाजी बाबूराव पाटील आणि सहकारी चंद्रकांत जाधव (दोघे रा. लातूर) हे पुण्याहून जुनी फॉर्चुनर कार (एमएच ०४ एडी ७९२६) विकत घेऊन लातूरकडे निघाले होते. लघुशंकेसाठी त्यांनी टेंभुर्णी येथील बाह्यवळण महामार्गावर कुर्डूवाडी रोडवरील उड्डाण पुलाच्या अलीकडे गाडी थांबवली. त्याच वेळेस अचानक आठ ते दहा जणांच्या टोळक्यांने त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करीत दगडफेक करण्यास सुरुवात केली. या टाेळक्याने दोघांकडून दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने लुटलेे. त्यात सोन्याचा साखळ्या, सहा अंगठ्या आणि रोख रक्कम १६ हजार रुपयांसह दोन मोबाइल असा एकूण तीन लाख ८० हजारांचा ऐवज लुटून नेला. दगडफेकीत गाडीची पुढील काच फुटून तीन हजार रुपयांचे नुकसान झाले. या झटापटीत धनाजी पाटील यांचा उजव्या हातावर कोयत्याने मारहाण करण्यात आली. पाटील यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. घटना समजताच वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुढील सूचना दिल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...