आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर गावांत सौरऊर्जा पंप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड -भारनियमनाच्या काळात पाणीटंचाईला पर्याय म्हणून अपारंपरिक सौर ऊर्जेवरील विद्युत पंपाचा पर्याय दुर्गम भागात वरदान ठरत आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर आदिवासी भागातील किनवट-माहूर तालुक्यात शंभर गावांत सौर ऊर्जेवरील विद्युत पंपासह दुहेरी पंपावर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत मुख्यत: हातपंप आहे. हातपंप बंद पडल्यास गावात पाणीटंचाई निर्माण होते. वीज टंचाई ही राज्यासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात 15-16 तास वीज गुल होते. त्यामुळे अनेक गावांत पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. परिणामी शेतक-यांना हातपंपाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे कामाचे नियोजन विस्कटून जनजीवन विस्कळीत होते.

योजनेची वैशिष्ट्ये
ज्या गावातील विंधन विहिरीस पाण्याची पातळी चांगली आहे. उन्हाळ्यात पाणी चांगले राहत असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरील विद्युत पंप बसवण्यात येत आहेत. एकाच विंधन विहिरीवर सौरपंप व हातपंप दोन्ही कार्यरत ठेवता येतात.
उन्हाळ्यात पाणीपातळी खोल गेल्यामुळे हातपंप बंद पडला तरी सौरपंप पाणीपुरवठा सुरळीत राहतो. सूर्यप्रकाशाअभावी किंवा बिघाडामुळे सौरपंप बंद झाल्यास हातपंपावरून पाणीपुरवठा चालूच राहतो. दुर्दैवाने काही कारणाने स्रोत निकामी झाल्यास संपूर्ण यंत्रणा काढून दुसºया स्रोतावर उभारता येते.