आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेवरील चार्जिंगने सायकल चालते तासाला 30 किलोमीटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - परदेशातून युरेनियम आयात केल्याने देशात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे दुचाकीसाठी किलोमीटरला तासाला किमान दोन रुपयांचा खर्च लागत आहे. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी येथील आरडी भक्त तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी सायकलची निर्मिती केली आहे. ही सायकल ताशी 30 किलोमीटरचे अंतर पार करते, असा दावा विद्यार्थ्यांनी केला.
पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारे वाहन हे एक किलोमीटर चालवायचे असेल तर त्यासाठी दोन ते पाच रुपयांचा खर्च करावा लागतो. या खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून या वाढत्या खर्चावर बचत म्हणून तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. यामध्ये सोलार पॅनल सायकलवर बसविले आहे. याची जोडणी ही 12 व्होल्ट च्या बॅटरीला देण्यात आली आहे. यातून पुढे पॉवर कनेक्शन इलेक्ट्रिक मोटारला दिले आहे. दुचाकीसारखी गती वाढविण्यासाठी अक्सिलरेटर लावण्यात आले आहे. ज्यामुळे ही या सायकलची गती नियंत्रित करण्यास मदत होते. ही सायकल तयार करण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये सायकलची गती आणि वजनक्षमता वाढविल्यास अधिकचा खर्च करावा लागेल. ही सायकल तृतीय वर्षातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील गंगाधर दसमले, सचिन भोसले, रवींद्र अहिरे, शंकर बावस्कर, सुदर्शन मोरे, पूजा गिरी, सुजय कल्पेकर यांनी मार्गदर्शक प्राध्यापिका मधुशाला मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आहे. या विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे आर.डी.भक्त संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून कौतुक होत आहे. सध्या याचे प्रात्यक्षिक सुरू आहे.
पेट्रोलची बचत
पेट्रोलचे वाढते भाव पाहता वाहतुकीचा खर्च वाढत चालला आहे. तसेच प्रदूषणाचीही यात मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे. याला आळा घालण्यासाठी हा प्रयोग विद्यार्थ्यांनी पूर्ण केला.-प्रा. मधुशाला मगरे, आरडी भक्त तंत्रनिकेतन विद्यालय
नवा प्रयोग
तृतीय वर्षातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील गंगाधर दसमले, सचिन भोसले, रवींद्र अहिरे, शंकर बावस्कर, सुदर्शन मोरे, पूजा गिरी, सुजय कल्पेकर यांचा शोध
या साहित्याचा वापर : यामध्ये डी.सी.मोटार, 12 व्होल्ट क्षमतेची बॅटरी, गती कन्ट्रोलर, सोलार पॅनल, तारेची जोडणी करून बसवण्यात आले आहे. अशी सायकल तयार करण्यासाठी साधारणत: 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च लागणार आहे.