आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबडच्या जवानाचा अपघाती मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडीगोद्री - अंबड तालुक्यातील बळेगाव येथील जवानाचा पठाणकोट येथे शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला. ज्ञानेश्वर जनार्दन टेकाळे (32) असे या जवानाचे नाव आहे. यासंदर्भात पोलिस नियंत्रण कक्ष आणि प्रशासनाकडे रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध नव्हती.

ज्ञानेश्वर टेकाळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कूलरमधील पाणी बदलत असताना त्यांना शॉक लागला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात सैन्य दलाकडून टेकाळे यांच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता रुग्णवाहिकेतून जवानाचा मृतदेह पठाणकोट येथून रवाना करण्यात आला आहे, अशी माहिती ज्ञानेश्वरचे निकटवर्तीय बाळासाहेब नरोडे यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.