आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, हारकी लिमगाव येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - कौटुंबिक वादातून जावयाने केलेल्या चाकूहल्ल्यात सासू अनिता कोल्हे (४५) हिचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या पत्नी राणी वाघ हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील हारकी लिमगाव येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.
हारकी लिमगाव येथील शिवाजी वाघ याचा गावातील श्रीकृष्ण कोल्हे यांची मुलगी राणीसोबत तीन वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून शिवाजी याने सासुरवाडीत जाऊन पत्नी व सासूसाेबत वाद घालून त्यांच्यावर चाकूहल्ला केला.