आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबाजोगाईत चाकूने भोसकून आईचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - व्यवसाय सुरू करण्यासाठी चार लाख रुपये देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईचा चाकूने भोसकून खून केला. या वेळी आईला वाचविण्यास गेलेल्या बहिणीवरही चाकूहल्ला केल्याने तीही जखमी झाली. ही घटना येथून जवळच असलेल्या मोरेवाडी परिसरात शनिवारी रात्री घडली.
गजानंद सोमनाथ चौधरी (वय 23 ) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मेकॅनिकल विषयात अपयश आल्याने गेल्या काही दिवसांपासून खासगी व्यवसायासाठी चार लाख रुपयांची मागणी तो आई सुरेखाकडे करीत होता. खानावळ चालवून सुरेखा चौधरी यांनी दोन मुलींचे लग्न केले होते. तिसरी मुलगी सीमाचे शिक्षण सुरूअसल्याने व तिच्याही लग्नासाठी पैसा उभा करणे गरजेचे असल्याने आईने गजानंदला काही दिवस थांबण्याचे वेळोवेळी सांगितले, परंतु मुलाचा तगादा सुरूच होता.
4 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गजानंद याने रागाच्या भरात आईवर चाकूने वार केले. या वेळी ‘आईला मारू नकोस ’ असे म्हणत अडवण्यास गेलेल्या बहीण सीमावरही हल्ला केला, यात ती गंभीर जखमी झाली.
तिच्यावर येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आईचा मृत्यू झाला. आईचा खून व बहिणीवर चाकूहल्ला करणारा गजानंद स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. आरोपीचे वडील सोमनाथ चौधरी हे अभियांत्रिकी महाविद्यालयात पहारेकरी आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करीत आहेत.
परभणी तालुक्यात मुलाने केला आईचा खून