आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी तालुक्यात मुलाने केला आईचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जेवायला देत नसल्याच्या कारणावरून मनात राग धरून गळ्यावर कुºहाडीने घाव घालून मुलाने आईचा निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील साडेगाव शिवारात रविवारी घडली.
तालुक्यातील साडेगाव येथील रहिवासी असलेल्या सरस्वतीबाई रामराव बनसावडे (वय 50) या स्वत:च्या शेतात कामासाठी गेल्या. या वेळी त्यांच्यासोबत काही महिलादेखील शेतात खुरपणीचे काम करीत होत्या. सकाळी अकरा वाजता त्यांचा मुलगा आप्पाराव ऊर्फ गोट्या बनसावडे (वय 21) हा रागारागात शेतात आला. सरस्वतीबाई यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नेहमी भाजी चांगली करीत नाहीस, आज जेवायला शिळे दिलेस असे बोलत जोरात भांडण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्याच्या हातात कुºहाड होती. वाद सुरू असतानाच आप्पाराव याने सरस्वतीबाई यांच्या गळ्यावर वार केले. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सरस्वतीबार्इंचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल माकणीकर, ग्रामीणचे फौजदार ई. एच. जाधव घटनास्थळी गेले. पोलिसांनी आप्पाराव अटक केली आहे.