आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादातून वडिलांचा खून, घनसावंगी तालुक्यातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घनसावंगी - दारूच्या नशेत मुलाने जमीन वाटणीच्या वादातून वडिलांचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना गुरुपिंप्री (ता. घनसावंगी) येथे मंगळवारी रात्री घडली. सुरेश रामभाऊ साबळे (३०) असे आरोपीचे नाव असून घनसावंगी पोलिसांनी त्याला अटक केली. गुरुपिंप्री येथे मातंग वस्ती भागात राहणा-या रामभाऊ साबळे (६०) यांना चार एकर जमीन होती. ही जमीन बटईने देऊन रामभाऊ त्यातून उदरनिर्वाह करत होते. रामभाऊ यांची तिन्ही मुले वेगळी राहतात. तीन महिन्यांपूर्वी पत्नी वारल्याने रामभाऊ मुलगा सुरेश साबळे याच्याकडे राहत होते. सुरेश नुकताच ऊसतोडीवरून परतला हाेता. मंगळवारी सायंकाळी सुरेशने दारू ढोसली व नशेत रामभाऊ यांच्यासोबत जमीन बटईने देऊ नका, असे म्हणत हुज्जत घातली. वाद विकोपाला गेल्यानंतर सुरेशने डोक्यात दगड-विटा घालून त्यांचा खून केला. मृतदेह घराबाहेर ओढत नेत असताना सुरेशला शेजा-याने पाहिले व दूरध्वनीद्वारे घनसावंगी पोलिसांना माहिती दिली. बीट जमादार बी. टी. हरिचंद्रे यांनी पहाटे तीन वाजता सुरेशला ताब्यात घेतले. दरम्यान, घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सुरेशवर घनसावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.