नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एम. डी. (जनरल मेडिसीन) परीक्षेत डॉ. सोनिया अजित डहाळे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. त्या डॉ. पूनम शिवदे व डॉ. रवींद्र शिवदे यांची कन्या आहे.
डॉ. सोनिया डहाळे यांचे एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण नाशिकमधील मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात झाले. एम.डीचे शिक्षण मुंबई येथील टोपीवाला नॅशनल मेडिकल महाविद्यालय व नायर रुग्णालय येथे झाले.