आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - या वर्षी पाऊस लांबला असला तरीसुद्धा सोयगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दिली. तालुक्यात आतापर्यंत 27 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. मक्याची लागवड 8,800 हेक्टर क्षेत्रावर झाली तर त्यापाठोपाठ सोयाबीनला शेतकर्‍यांनी पसंती दिल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एस. सरसमकर यांनी दिली.

दीड-दोन महिने पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल होते. परंतु पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांची लागवड, पेरणी मोठय़ा प्रमाणात वाढली. यामध्ये सर्वाधिक पसंती कपाशीला दिली आहे. यंदा तालुक्यात पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. 9 धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.