आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला ग्रामसभेला: ग्रामविकास आराखड्यासाठी आज विशेष ग्रामसभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- राज्य सभासदस्य राजकुमार धूत यांनी सांसद आदर्श दत्तक ग्राम योजनेअंतर्गत निवड केलेल्या वेरूळ येथे बुधवारी ( १३ मे) ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी सायंकाळी वाजता जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांच्या उपस्थितीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेरूळ गावाचा कायापालट करून सर्वांगीण विकासासाठी खासदार धूत यांनी सव्वादोन कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले अाहे. तसेच यामध्ये ग्रामपंचायत इमारत बांधकाम, ग्रंथालय, व्यायामशाळेच्या उभारणीसाठी ५० लाख रुपये, दशक्रिया विधी घाटाच्या सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये, गावातील सिमेंट रस्त्यांसाठी ५० लाख रुपये तसेच गावातील मुख्य चौकात हायमास्ट दिवे बसवण्यासाठी १० लाख रुपये, गावातील शाळेस संगणकासाठी लाख रुपये, सार्वजनिक शौचालयासाठी १० लाख रुपये, अंगणवाडी खेळाच्या साहित्यासाठी लाख रुपये, गावातील रस्त्याच्या दुर्तफा विजेचे दिवे बसवण्यास १० लाख, कब्रस्तानची संरक्षक भिंत उभारणीसाठी - १० लाख रुपये, स्मशानभूमी विकासासाठी १० लाख रुपये, तीर्थकंुड स्मशानभूमी विकासासाठी लाख रुपये, समंतभद्र शाळेला संगणकासाठी लाख रुपये, पथदिवे बसवण्यासाठी २५ लाख रुपये असा हा निधी खर्च केला जाणार आहे. या ग्रामसभेत भारतीय पुरातत्त्व विभाग, बँक अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभाग कर्मचारी, अंगणवाडी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष ,बचत गट वेरूळचे ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेदेखील काम होणे गरजेचे
१.सद्य:स्थितीत सुरू असलेल्या येळगंगा नदीच्या विकासामध्ये घृष्णेश्वर मंदिर ते वेरूळ लेणी घाट असा पर्यटकांना फिरण्यासाठी रस्ता तयार करणे.

२. वेरूळ येथे महिन्याकाठी जगभरातील हजारो पर्यटक येत असतात, मात्र तरीदेखील या ठिकाणी बसस्थानक नाही, तसेच प्रवाशांना थांबण्यासाठी कसल्याही प्रकारचे शेडदेखील तयार करण्यात आलेले नाही.

३. मालोजीराजे भोसले स्मारक तसेच मालोजी, व्यंकोजी, विठाजी यांच्या समाधिस्थळांचे सौंदर्यीकरण जीर्णोद्धार करणे.
बातम्या आणखी आहेत...