आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Rooms On Bus Stand For Feeding Are In Bad Condition

जालना बसस्थानकातील हिरकणी कक्ष शोभेची वास्तू, स्तनदा मातांना अनेक अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - स्तनदा मातांची कुचंबणा रोखण्यासाठी शासनाने राज्यभरातील बसस्थानकांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कक्ष स्थापन झाले खरे पण या कक्षाकडे कुणीच लक्ष न दिल्यामुळे ते शाेभेचे ठरले आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी होत असून हिरकणी कक्षाअभावी स्तनदा मातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

राज्यभरातील लाखो प्रवासी दररोज एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. विशेषत: दिवाळी आणि उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते. महिला प्रवाशांसाठी बसमधील काही अासने राखीव ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने शासनाच्या आदेशानंतर बसस्थानकात हिरकणी कक्ष सुरू केले. त्यामुळे स्तनदा मातांना दिलासा मिळाला. मात्र, काही दिवसांतच हे कक्ष दुरवस्थेच्या विळख्यात आले. जालना बसस्थानकातील कक्षातही असुविधा असून याकडे लक्ष नसल्यामुळे अडचणी येत आहेत.

असा असावा कक्ष
हिरकणी कक्ष हा ८ बाय १० फूट अाकाराचा असावा, स्थानकातील वाहतूक नियंत्रकाच्या बाजूला हा कक्ष असतो. कक्षाच्या दर्शनी भागात लहान मुलांचे चित्र लावून कक्ष सजवलेला असावा. तसेच खिडक्यांना पडदे लावण्यात येवून फॅन, खुर्च्या, सतरंजीची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

खिडकीवरील पडदे गायब
जालना कक्षात खुर्ची व टेबल ठेवण्यात आले होते. मात्र, खुर्ची, टेबल नाही. तर खाली सतरंजी अंथरलेली आहे. मुख्य खिडकीवरील पडदा गायब झाला आहे. शिवाय दरवाजावर कक्षाचे नावाने कागदाचे पेास्टर लावले असून तेही प्रवाशांना ठळकपणे दिसत नाही.