आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चात बीडचा ‘आवाज’, पूजा मोरेच्या भाषणाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - कोपर्डी अत्याचार प्रकरण, मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत बुधवारी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मूकमहामोर्चाने गर्दीचे सर्व उच्चांक तोडले. या मूकमोर्चात बीडच्या युवतीचा ‘आवाज’ घुमला. मोर्चाच्या सांगतेवेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आलेल्या मुलींमध्ये गेवराई पंचायत समितीची सदस्य असलेल्या पूजा अशोक मोरे या अभियंता तरुणीने दुसऱ्या क्रमांकावर प्रभावी भाषण करून जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले.
 
मिरगाव (ता. गेवराई) येथील रहिवासी असलेली पूजा औरंगाबादच्या पीईएस महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत अंतरवली गणातून शिवसेनेकडून निवडून आली आहे. मुंबईतील मोर्चात राज्यभरातून मोजक्याच मुलींना भाषणाची संधी देण्यात आली होती. यात दुसऱ्या क्रमांकावर बोलताना पूजाने महिला अत्याचार, मराठा समाजाची स्थिती, ग्रामीण महिलांच्या प्रश्नांचा ऊहापोह केला. प्रभावी वक्तृत्वाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘दिव्य मराठी’शी बोलताना पूजा म्हणाली, मराठे युद्धात जिंकतात अन् तहात हरतात, अशी एक म्हण यापूर्वीच्या इतिहासामुळे होती, परंतुु मुंबईच्या मोर्चानंतर ही म्हण बदलली असून मराठे युद्ध आणि तह दोन्ही जिंकतात, अशी नवी म्हण तयार झाली आहे. ग्रामीण महिलांचे प्रश्न मांडले. 
 
क्षण अविस्मरणीय जबाबदारीचाही 
इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर समाजाचे प्रश्न मांडता आल्याचा निश्चित आनंद आहे. हा क्षण अविस्मरणीय आहेच, पण जबाबदारीचाही आहे. यापुढेही महिलांसाठी काम करावयाचे अाहे. - पूजा अशोक मोरे, पंचायत समिती सदस्य, गेवराई 
 
पुढील स्लाइडवर वाचा, जिल्ह्यातील युवतींसाठी प्रेरणास्रोत...
बातम्या आणखी आहेत...