आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कारचे टायर फुटल्याने दोघींचा मृत्यू, दोन चुलत बहिणी जागीच ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा - आजीच्या दहाव्यासाठी निघालेल्या दोन महिला अपघातात ठार झाल्या. शेलगाव- वांगी (ता. करमाळा) येथील खाडे कुटुंबीय कारने (एमएच १३ बीएन ३७३६) शेगावहून जेऊर - करमाळामार्गे आष्टीकडे (जि. बीड) जात होते. झरे फाटयाजवळ समोरील टायर फुटल्याने कार तीन वेळा उलटली, यात सुनंदा रामचंद्र खाडे (वय ५०) व मीरा सारंगधर खाडे (वय ४५) या दोन चुलत बहिणी जागीच ठार झाल्या.
सोमवारी सकाळी सहा वाजता हा अपघात घडला. त्यात संपत खाडे,भागूबाई खाडे आणि कलावती केकान (सर्व रा. शेलगाव ता. करमाळा) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना करमाळा येथे उपचारा करुन पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठिवण्यात आले आहे. शेलगाव येथील खाडे कुटुंबीय कारने (ता. आष्टी जि. बीड) येथे आपल्या आजीच्या दशक्रिया विधीला निघाले होते. तेव्हा काळाने अशी झडप घातली. अपघाताची खबर रेवण रामचंद्र खाडे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस
करत आहेत.