आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Spliting In Shiv Sena BJP And Congress Nationalist Beneficial Sharad Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमेदवार वाढल्याने कमाईवाल्यांची मजा, शरद पवार यांची टिप्पणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनापूर- महायुती आणि आघाडी तुटल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे कमाईवाल्यांचे फावणार आहे. मतदारांनी मात्र चांगल्या उमेदवाराचीच निवड करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केले. बदनापूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, निवडणुकीत काही लोकांचे कमाईकडे लक्ष असते.
आता उमेदवारांची संख्या वाढली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे असे किती उमेदवार असतील ते सांगता येणार नाही. उमेदवार वाढल्याने कमाईवाल्यांचे फावणार आहे. मतदारांनी मात्र शेतातील खराब तण खुरपून टाकतो तसे खराब उमेदवारांना बाजूला करून चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे.