आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्पदंशावर उपचार घेताना दिला पेपर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम (जि. उस्मानाबाद) - सर्पदंशावर उपचार घेताना ग्रामीण रुग्णालयातूनच एका विद्यार्थिनीने दहावीचा भूमितीचा पेपर दिल्याची घटना शनिवारी भूम येथे घडली. या मुलीच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.

आष्टा येथील शुभांगी पोपट गपाट ही भूम येथील रवींद्र हायस्कूल या केंद्रातून परीक्षा देत आहे. शनिवारी सकाळी 11 ते 1.30 या वेळेत भूमिती विषयाचा पेपर होता. मात्र, तत्पूर्वी शुभांगीला सकाळी 8.30 वाजता साप चावला. तिला भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. शुभांगीचे वडील शेतकरी असून ती जिद्दीने शिक्षण घेत आहे. परीक्षेच्या वेळी ओढवलेल्या प्रसंगामुळे शुभांगीचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. गटशिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिलीप सहस्रबुद्धे, शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके यांच्याशी चर्चा करून रुग्णालयातून पेपर सोडवण्याबाबत परवानगी घेतली. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार ही परवानगी मिळाली. चार कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली शुभांगीने पेपर सोडवला. शाळेचे सचिव आर.डी. सूळ यांनीही प्रक्रिया पार पाडण्यात मदत केली.