आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटाबंदीमुळे दहावी, बारावीचे परीक्षा फॉर्म २९ पर्यंत स्वीकारणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदनपत्रे २९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदनपत्रे विलंब शुल्कासह २२ ते २८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. नुकत्याच ५०० व १००० च्या चलनी नोटा बंद झाल्या आहेत. फेब्रुवारी-मार्च २०१७ साठी इयत्ता १२ वी व १० च्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरताना अनेक अडचणी येत असल्याचे काही शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांनी मंडळाच्या व शासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत शिक्षणमंत्री यांनी तातडीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शुल्क जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नसली तरी प्रथम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून तो मंडळाकडे सादर करावे.
बातम्या आणखी आहेत...