आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव बस झाडावर आदळून बसचालकासह १९ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता पुण्याहून बीडला येणारी भरधाव बस नवगण राजुरी फाट्यावर बसचालकाला डुलकी लागल्याने वडाच्या झाडावर आदळली. या अपघातात बसचालकासह १९ प्रवासी जखमी झाले आहेत.

बीड आगाराची पुणे- बीड ही बस पुण्याहून १७ प्रवाशांना घेऊन बुधवारी रात्री अकरा वाजता बीडकडे निघाली. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता ही बस बीड तालुक्यातील नवगणराजुरी फाट्याजवळ आली असता. वाहनचालकाला अचानक डुलकी लागल्याने भरधाव बस थेट रस्त्यालगतच्या वडाच्या झाडावर जाऊन आदळली.
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार : बसमधील गणेश नामदेव अंकुश (रा.पाटोदा), अंकुश बाबूराव सोनवणे (रा. आनंदगाव सारणी, ता. केज), अशोक रावसाहेब हंगे (रा. थेरला, ता. पाटोदा), मधुकर भगवान सानप (रा. लिंबारुई, ता. पाटोदा), आसाराम सुग्रीव कांदे, शब्बीर अब्दुल रहेमान, अतुल पांचाळ, लक्ष्मण प्रभाकर काळे, रमेश चंद्रकांत डावकर, संजय देविदास शिंदे, मोहराबाई अंकुश सोनवणे, महारुद्र दत्तात्रय राऊत, दिनकर दगडू भवर, अरविंद गंगाधर फाकटकर, अजय मारुती तावरे, अाशुतोष प्रल्हाद ठाेकळे, रुक्मिणी भंवर, अंकुश बाबूराव आढळकर, चंद्रकांत श्रीमंतराव माेरे हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात डाॅ. प्रवीण देशमुख, डॉ.मनोज घडसिंग, डॉ. अशिष गर्जे, महादेव चिंचोले यांनी उपचार केले.

ओव्हरटाइम ड्यूटी दिल्याने अपघात
बीड आगाराकडून बसचालकांना ओव्हरटाइम ड्यूटी दिली जात असल्याने वारंवार अशा प्रकारचे अपघात घडत असल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती. तीन दिवसांपूर्वीच बीड शहराजवळील तळेगाव येथे पुण्याहून बीडला येणाऱ्या पुणे -बीड बसचा रॉड तुटल्याने अपघात घडला होता. यात नऊ प्रवासी जखमी झाले होते.

झाडामुळे घर वाचले
पुणे-बीड ही भरधाव बस गुरुवारी पहाटे नवगण राजुरी फाट्यावरील वळणावर वाहकाचा तोल सुटल्याने वडाच्या झाडावर आदळली. तिथे जर झाड नसते तर ही बस रस्त्यालगतचे उत्तम ढास या शेतकऱ्याच्या घरावर जाऊन आदळली असती. झाडामुळे मोठा अपघात व जीवितहानी टळली.
बातम्या आणखी आहेत...