आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर-निलंगा रस्त्यावर पुन्हा अपघात; तिघांचा मृत्यू, 7 गंभीर; पंधरा दिवसांत तिसरा अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू आहे. चार अपघातांत १९ जणांचा मृत्यू झाला असतानाच शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा निलंगा-लातूर मार्गावर बस आणि ट्रकचा अपघात झाला. त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या १५ दिवसांत एकाच रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे.    


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी  लातूर-हैदराबाद जाणारी एसटी लातूर बसस्थानकावरून निघाली. औशाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा पाटीजवळ पावणेबाराच्या सुमारास या बसची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर लातूरहून येणारे ईश्वर पाटील यांनी आपल्या वाहनातून निलंगा येथे उपचारासाठी आणले. तसेच अन्य जखमींना लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात हलवले. लातूर ते निलंगा या रस्त्यावर हा तिसरा मोठा अपघात आहे. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी एसटी-ट्रकच्या अपघातात ७ जण जागीच ठार झाले होते, तर २६ नोव्हेंबर रोजी याच परिसरात झालेल्या कार अपघातात तिघे ठार झाले होते.  

 

जखमींची नावे
अमित रामकृष्ण भोज,  मोहंमद इस्माईल बागवान, सोनू किसन काळे, ओमप्रकाश जगन्नाथ पाटील, सुनील सतीश शिंदे, किशोर गोरख डोंगरे, अनिस मन्सूर शेख.    

 

 

मृतांची नावे    
सोनल अमित भोज (२२, रा. दापका वेस निलंगा), आयशा इस्माईल बागवान (५०, रा. हैदराबाद), बापूसाहेब बिडवे (५०, रा. अडसूळवाडी, ता. कळंब) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. अपघाताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...