आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकास मारहाण, बस पोलिस ठाण्यात; बस न थांबल्याने प्रवाशाचा 1 किमी पाठलाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- तालुक्यातील हाजीपूर येथून बीडला निघालेली बस पारगाव सिरस थांब्यावर थांबवली नाही म्हणून प्रवाशाने एक किलोमीटर पाठलाग करून बसलाच दुचाकी आडवी लावली. बस थांबवत चालकास शिवीगाळ करून सकाळी दहा वाजता मारहाण केली. चाळीस प्रवासी असलेली बस चालकाने थेट बीड ग्रामीण पाेलिस ठाण्यात नेऊन मारहाण करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. या गोंधळात एक तास प्रवाशांना पोलिस ठाण्यात ताटकळत थांबावे लागले.

बसचालक पांडुरंग भाऊराव बनसोडे यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी सकाळी हाजीपूर-बीड (एमएच २० बीएल ०३७२) बस चाळीस प्रवाशांना घेऊन बीडकडे निघाली. पारगाव सिरस येथील थांब्यावर बस आली तेव्हा बसमध्ये अाधीच प्रवासी जास्त होते. त्यात या गावात उतरणारे प्रवासी नसल्याने बस थांब्यावर थांबवता बीडच्या दिशेने नेली. दुचाकीवरून नारायण वासुदेव घुमरे (रा. पारगाव सिरस) याने बसचा एक किलोमीटर अंतरावरून पाठलाग करून बसला दुचाकी अाडवी लावून ती थांबवली. थांब्यावर बस का थांबवली नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. बसमध्ये त्यानंतर चालक बनसोडे यांनी चाळीस प्रवासी असलेली बस थेट बीड ग्रामीण पाेलिस ठाण्यात नेली. याप्रकरणी नारायण घुमरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार भाऊसाहेब िशरसाट आरोपीचा शोध घेत आहेत.

प्रवाशांची गैरसोय
मारहाणीची ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली. त्यानंतर चालकाने प्रवाशांसह बस ग्रामीण पाेलिस ठाण्यात नेली. गुन्हा दाखल हाेईपर्यंत चाळीस प्रवाशांना एक तास ठाण्यात ताटकळत थांबावे लागले. यामुळे प्रवाशांची नाहक गैरसोय झाली.

प्रवासी जास्त हाेते
> बसमध्ये प्रवासीसंख्या प्रमाणापेक्षा जास्त हाेती तसेच पारगाव सिरस येथे उतरणारे प्रवासी नसल्यामुळे बस थेट बीडकडे नेली. त्या मारेकऱ्याने पाठलाग करून मारहाण केली. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय झाली.
-पांडुरंग बनसोडे, चालक
बातम्या आणखी आहेत...