आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची भाडेवाढ टळणार !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - शासनाने डिझेलवरील अनुदान बंद केल्यामुळे चार दिवसांपासून दररोज चार कोटींचा तोटा सहन करणा-या एसटीने आता किरकोळ दराने म्हणजे खासगी पंपावर डिझेल खरेदीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विभागांकडे माहिती मागवण्यात आली आहे. खासगी पंपावर डिझेल खरेदी केल्यास एसटीची प्रवासी भाडेवाढ टळण्याची शक्यता आहे. शासनाने अनुदान बंद केल्यानंतर एसटीला 62.90, तर खासगी वाहनांना 52 रुपये 17 पैसे दराने डिझेल मिळत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला दररोज सुमारे 4 कोटींचा तोटा होत आहे.
महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाकडे 17 हजार 245 गाड्या आहेत. या गाड्या दररोज 27 लाख किलोमीटर प्रवास करतात. त्यासाठी 5 लाख 30 हजार लिटर (3 कोटी 39 लाख रुपये) डिझेल लागते. 18 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून डिझेलवरील अनुदान बंद केल्यामुळे एसटीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे एसटीकडून प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या हालचाली
सुरू झाल्या. सुमारे 20 टक्क्यापर्यंत भाडेवाढीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हे टाळण्यासाठी महामंडळाने मंगळवारी सर्व विभागांना तातडीचे पत्र पाठवून खासगी पंपाच्या पर्यायाविषयी माहिती मागवली आहे.