आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी घेणार खासगी पंपावरून डिझेल आजपासून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - केंद्र शासनाने डिझेलवरील अनुदान बंद केल्यामुळे दहा दिवसांपासून प्रतिलिटर 10.70 रुपये महागड्या दराने डिझेल खरेदी करणा-या एसटी महामंडळाने खासगी पंपावर डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून यामुळे संभाव्य 20 टक्के भाडेवाड टळली आहे.
खासगी वाहनांना 52 रुपये 17 पैसे दराने डिझेल मिळत आहे. एसटीला मात्र 10 रुपये 17 पैसे अधिक मोजावे लागत आहेत. यामुळे एसटीला रोज 2 ते 3 कोटींचा फटका बसत होता. 18 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून आतापर्यंत एसटीला सुमारे 10 ते 11 कोटींचा तोटा झाला. त्यामुळे 20 टक्के भाडेवाढ करण्याच्या हालचाली महामंडळाने सुरू केल्या होत्या. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अशा डिझेल खरेदीचा निर्णय झाला. महामंडळाला असा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी स्पष्ट केले.

अन्य राज्यांचा आदर्श
दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या महामंडळांनी यापूर्वीच हा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्‍ट्रातही हा निर्णय घेतला आहे.’’
जीवनराव गोरे, अध्यक्ष, एसटी महामंडळ