आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियाची पोलिसाला मारहाण, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळीअंबड/पाचोड - वाळूची चोरटी वाहतूक करणा-या तिघांनी पाचोड ठाण्याच्या पोलिसावर काठ्यांनी हल्ला केला. शनिवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात पोलिस जखमी झाला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकास अटक केली.


टाकळी अंबड पट्ट्यातून शरद नरके (32) व अशोक गोर्डे (31), संभाजी नरके (34) हे वाळूतस्करी करत असल्याचे पोलिस नाइक दत्ता रघुनाथ मुंडे यांच्या लक्षात आले. तिघांनाही त्यांनी पोलिस ठाण्यात चला, असे म्हटले. त्यावर शिवीगाळ करून या तिघांनी मुंडे यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. मुंडे यांनी पाचोड पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अशोक गोर्डेला अटक केली. इतर दोघे फरार झाले. या घटनेमुळे पोलिसांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देऊन मारहाण तसेच गौण खनिज अधिनियमानुसार तिघांवर पाचोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, उपनिरीक्षक अंबादास धाडवे पुढील तपास करत आहेत.