आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभापतिपदी गणेश देशमुख निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गणेश देशमुख यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विजय जामकर, बालासाहेब बुलबुले आदी. छाया : योगेश गौतम - Divya Marathi
परभणी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गणेश देशमुख यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विजय जामकर, बालासाहेब बुलबुले आदी. छाया : योगेश गौतम
परभणी -
परभणी महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी काँग्रेसचे नगरसेवक गणेश सुरेश देशमुख यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने गुरुवारी त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीवर सलग तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.

६५ सदस्यांच्या महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून त्याखालोखाल काँग्रेसचे संख्याबळ आहे. बहुमताच्या काठावर असलेल्या राष्ट्रवादीने पहिल्या अडीच वर्षांत भाजपच्या दोन व एका अपक्षाच्या सहकार्याने सत्ता काबीज केल्याने पहिले महापौर म्हणून प्रताप देशमुख, उपमहापौर म्हणून (कै.) सज्जुलाला यांनी, तर स्थायी समितीचे सभापती म्हणून सलग तीन वर्षे वय जामकर यांनी हे पद उपभोगले. विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आली.
महापौरपदी राष्ट्रवादीच्या संगीता वडकर, तर उपमहापौरपद काँग्रेसचे भगवान वाघमारे यांच्याकडे आले. या तडजोडीत स्थायी समितीचे सभापतिपदही काँग्रेसकडे आले आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख यांना सभापतिपद देण्यावर दोन्ही काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे देशमुख यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
परभणी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गणेश देशमुख यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विजय जामकर, बालासाहेब बुलबुले आदी. छाया : योगेश गौतम
बातम्या आणखी आहेत...