आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा विक्रीवर युवा फेडरेशनने केली परभणी शहरात गांधीगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्ह्यात सर्रास विक्री होत असलेल्या गुटखा विक्री व अन्न व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीच्या प्रश्नावरून अखिल भारतीय युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गांधीगिरी करीत प्रशासनाचे या बाबीकडे लक्ष वेधले. कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात
गुटख्याच्या पुड्या
टेबलवर टाकल्या.
शासनाकडून गुटखा विक्रीला बंदी असली तरीदेखील जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री होत आहे. प्रत्येक ठिकाणी पानटपऱ्यांसह छोट्या-छोट्या दुकानांतून विविध कंपन्यांचा गुटखा विक्री केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मात्र त्याकडे डोळेझाक केली आहे. अधूनमधून गुटखा पकडण्याची थातूरमातूर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आवक व विक्री होत आहे. याचे दुष्परिणाम कित्येकांना भोगावे लागत आहेत. गुटखा विक्रीबरोबरच अन्न व दुग्धजन्य पदार्थांत भेसळ मोठ्या प्रमाणावर होण्याचेही प्रकार वाढले आहेत. भेसळीच्या व्यवसायाने टोक गाठले आहे, असा आरोप युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्व प्रकारांवर निर्बंध घालण्यात वा कारवाई करण्यात अन्न व औषध प्रशासन कार्यालय कुचकामी ठरले आहे. त्यामुळे कार्यालयाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यात येत आहे, असे नमूद करीत कार्यकर्त्यांनी मंगळवारी कार्यालयात गुटख्याच्या पुड्या अधिकाऱ्यांना दाखवून दिल्या. गांधीगिरी करीत आता तरी कारवाई करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
आंदोलनात युवा फेडरेशनचे अॅड.लक्ष्मण काळे, संदीप सोळुंके, अमोल जाधव, सचिन देशपांडे, गंगाधर यादव, महिप रेवणवार, गजानन देशमुख, शेख एजाज, शैलेश निर्मळ आदी युवक सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...