(फोटो: आढावा बैठकीत अशोक चव्हाणांसोबत खडसे.)
नांदेड- राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शक्यता नाही. दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी यंदा शेतकऱ्यांना वीज बिल माफी, कर्जमाफीची सवलत दिली जाण्याची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाहणी दौरा फार्सच ठरण्याची शक्यता आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी रात्री नियोजन भवनात खासदार, आमदारांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. रब्बी, खरीप दोन्ही पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाचे कर्ज, वीज बिल माफ करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. त्यावर खडसे म्हणाले, महावितरणची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वीज बिल, तर सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कर्जमाफीही देता येत नाही. त्याची अपेक्षा करू नका, असे स्पष्ट सांगून त्यांनी या मागण्या फेटाळल्या. सर्व काही आहे टंचाईच्या नियमानुसार मिळेल, असे ते म्हणाले.
अपेक्षा फोल ठरल्या : महसूलमंत्र्यांनीवीजबिल, कर्जमाफीचा मुद्दा मंत्रिमंडळापर्यंत नेण्याची अपेक्षा होती. बैठक फोल ठरली. -अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, खासदार.