आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Finance Minister Sudhir Mungantiwar Comment On New District Issue

नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाबाबत मी बोललो नाही : मुनगंटीवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- प्रस्तावित २२ जिल्ह्यांबाबत नागपूर येथे पत्रकारांनीच मला माहिती दिली. त्यावर कोणत्याही जिल्हा अथवा तालुका निर्मितीची प्रक्रिया कशी असते याची प्रोसिजर मी त्यांना सांगितली. परंतु त्या संदर्भात एकनाथराव खडसे आणि माझी परस्परविरोधी भूमिका असल्याचे दाखवून निष्कारण संभ्रम निर्माण करण्यात आला, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या श्रीशैलम येथे आहेत. तेथून "दिव्य मराठी'शी बोलताना ते म्हणाले, नव्या जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या निर्मितीसंबंधी मला कोणतीही कल्पना नव्हती. असा प्रस्ताव आहे अथवा नाही याबाबत मी कोणतेही विधान केले नाही. माझ्या माहितीनुसार, महसूलमंत्री एकनाथराव खडसेही त्याबाबत काही बोलले नाहीत. नागपुरात याबाबत जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा त्यावर मी प्रोसिजर सांगितली. यावर मुख्य सचिवच निर्णय घेतात. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची एक कायमस्वरूपी समिती असते. त्यातच अशा प्रश्नावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतले जातात. हेच मी सांगितले. परंतु माध्यमात खडसे आणि माझे विधान परस्परविरोधी दाखवून संभ्रम निर्माण केला, असे सांगून त्यांनी माध्यमांनाच दोषी धरले.