आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारने विश्वासघात केला; त्यांना अांदाेलनाचीच भाषा कळते; तुपकरांचा सरकारवर चाैफेर हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- दिवंगत गाेपीनाथराव मुंडे यांनी राज्यात भाजप सरकार येण्यासाठी अनेक छोट्या छोट्या संघटना  एकत्र केल्या. भाजप सत्तेवर अाला. पण अडीच वर्षांत कोणाचेच प्रश्न सुटले नाहीत. शेतकरी अांदाेलनात सरकार पडते की काय अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटू लागली अन‌्  शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी जाहीर करत मूळ प्रश्नांना सतत बगल िदली. भाजपा सरकारने राज्यात गाेड बाेलून िवश्वासघात केला. सत्तेत राहून प्रश्न सुटले नाहीत. आता या सरकारला अांदाेलनाचीच भाषा समजेल, असा चाैफेर हल्ला करत, अाता मुंडे साहेबांच्या बीडच्या भूमीतून सरकार िवराेधी अांदाेलनाची दिशा ठरवली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी बीडमध्ये दिली.   

स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर खासदार राजू शेट्टींची साथ देत तसेच वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा िदल्यानंतर तुपकर  प्रथमच साेमवारी (िद. ११) बीडमध्ये आले. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदमध्ये ते बाेलत हाेते. या वेळी दादासाहेब मुंडे उपस्थित होते.   

तुपकर म्हणाले...
कोणत्याही सत्ताधाऱ्यांना चळवळी मोठ्या झालेल्या चालत नाहीत.  काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारच्या  काळात राज्यभरामध्ये शेतकरी आत्महत्या माेठ्या प्रमाणात झाल्या. तसेच अन्यायही  झाला. त्यामुळे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वावर  विश्वास ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाजपात  प्रवेश केला. सत्तेत अाल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवण्याचा प्रयत्न केला. पण सुटलेच नाहीत.  दरम्यान वस्त्राेद्याेग महामंडळावर मला अाणि राज्यमंत्रिपदावर सदाभाऊ खाेत यांची निवड केली तेव्हा िवश्वास वाटला की अाता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची साेडवणूक हाेईल. पण सत्तेत अाल्यानंतर मूळ प्रश्न सुटत नसल्याचे जाणवले.  ज्यांना शेतीविषयी माहिती नाही त्यांच्यासमवेत सरकारने चर्चा करून फसवी कर्जमाफी जाहीर केली, असा अाराेप त्यांनी केला. 

अशी असेल अांदाेलनाची पुढील दिशा
संघटनेची पुनर्बांधणी व शेतकरी प्रश्नांवर संघटनेतर्फे संवादयात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामधून केली जाईल. सोयाबीन व कापसासाठी मराठवाडा व विदर्भात अांदोलन करणार आहोत. आमच्या  संघटनेत हुकूमशाही नव्हे लोकशाही पद्धतीने काम केले जाते, असेही तुपकर म्हणाले.    
 
आमची लढाई विचारांची !   
राज्यात ५० पेक्षा अधिक शेतकरी संघटना कार्यरत आहेत; परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारांची कास सोडली नाही. पदांना न भुलता प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. आमची लढाई विचारांची आहे.  खासदार शेट्टी यांचे नेतृत्व देशभरातील इतर शेतकरी संघटना स्वीकारण्यास तयार आहेत.
बातम्या आणखी आहेत...