आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बबन लोणीकरांविरुद्ध परतूर पोलिसांत तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- परतूर-मंठा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात दिशाभूल करणारी शैक्षणिक पात्रता नाेंदवलेली आहे. यामुळे लोणीकरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते कैलास फुलारी यांनी परतूर पोलिस ठाण्यात केली आहे.

मंत्री लोणीकर यांनी वर्ष २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात शैक्षणिक पात्रता बी. ए. प्रथम वर्ष अशी नमूद केली. तर वर्ष २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात शैक्षणिक पात्रता इयत्ता पाचवी उत्तीर्ण असल्याचे नमूद केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...