आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढग दिसताच कृत्रिम पाऊस, मराठवाड्यासाठी २३ कोटींच्या तरतुद; लाेणीकरांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गेल्या महिनाभरापापासून पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या मराठवाड्यासाठी खुशखबर आहे. आकाशात पावसाचे ढग दिसताच कोणत्याही क्षणी पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

औरंगाबादपासून २५० किलोमीटर अंतरापर्यंत या प्रयोगाचा लाभ होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा तथा स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.

मराठवाड्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. ही मागणी विचारात घेऊन सरकारने मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे लोणीकर म्हणाले.

ढगांमध्ये पाणीच नाही : गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ढगांमध्ये पाणीच नसल्याने प्रयोग लांबणीवर टाकला जात आहे. पाण्याचे ढग गोळा झाल्याची माहिती मिळताच हा प्रयोग केला जाणार असल्याचे लोणीकरांनी सांगितले. या प्रयोगाचा मराठवाड्यासह बुलडाणा जिल्ह्यालाही लाभ होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...