आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Dinkar Ravate In Parbhani, Newspaper Venders Meet

वृत्तपत्र क्षेत्रात विक्रेता हाही महत्त्वाचा घटक- दिवाकर रावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- वर्तमानपत्राच्या क्षेत्रात ज्याप्रमाणे इतर घटक महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता हा वितरण क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले.

वसमत रस्त्यावरील रुख्मण मंगल कार्यालयात अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय जाधव, आ. डॉ.राहुल पाटील, आ. मोहन फड, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष आर. डी. देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय कच्छवे, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, प्रा.मनोहर सुर्वे, आयोजक राजेश चोरमले, दत्तात्रय माळी, अशोक घुसळे, सोमेश्वर लाहोरकर, गजानन रोकडे आदींची उपस्थिती होती.

रावते म्हणाले की, वृत्तपत्र वितरण हे काम अत्यंत जिकिरीचे असते. ते काम विक्रेते नियमितपणे करतात. त्यामुळेच वाचकांना विश्वात घडलेल्या घटना घरपोच वाचावयास मिळतात. त्यांच्या समस्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. प्रारंभी रावते यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी वृत्तपत्र वितरक सुनील खरवडे, अरुण झांबरे, अनिल खंदारे, संजय पावडे, महेश कोकड, तसेच गुणवंत विद्यार्थी संकेत बागडे, पंजाब येथील राष्ट्रीय गतका स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल अविनाश चोरमले आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रल्हाद देवडे यांनी तर गजानन रोकडे यांनी आभार मानले. यावेळी शेख पाशा, किशोर लहाने, शेख निसार शेख पठाण, बाबासाहेब गायकवाड, आनंता खटिंग, शंकर खटिंग, शरद महाजन, नितीन म्हैत्रे, प्रल्हाद टोंग, सूर्यकांत मोगल, बालाजी म्हैत्रे, गंगाधर भोगे, दिगंबर माळी, चंद्रकांत वंजारे, बद्रिनाथ कदम, प्रभाकर खटिंग, अविनाश राठोड, बालाजी काजळे, माणिक जाधव, शाम साखरे, ऋृतिक भवर, विठ्ठल शिंदे, ज्ञानदेव बोबडे, शाहरुख शेख, सतीश पतरे, काकासाहेब सूर्यवंशी, विनायक शिंदे, विठ्ठल शिंदे, श्रीराम गवळी आदी उपस्थित होते.

परभणी येथे अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दिवाकर रावते यांनी विचार मांडले.