आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित दीनदयाळजींचे स्वप्न पूर्ण करावे : मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- प्रत्येकाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची योजना आखली होती. हीच योजना दीनदयाळ बँकेने अमलात आणून सर्वसामान्यांना बँकेच्या माध्यमातून आधार द्यावा, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी पंकजा मुंडे शुक्रवारी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक कुकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे, आमदार आर.टी.देशमुख, नगराध्यक्षा रचना मोदी, डॉ. दिगंबर दंडे, बँकेचे अध्यक्ष शरयू हेबाळकर, उपाध्यक्ष विजयकुमार कोपले, आदी उपस्थित होते. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, माझी राजकीय सुरुवात बँकेच्या संचालकापासूनच झाली आहे. कर्जदारांनी कर्ज घेताना परतफेडीचे नियोजन करावे, त्यामुळे बँकेत आपली पत निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या. मूलभूत तत्त्वाचे बँकांनी पालन करावे, असे पूर्व संघचालक डॉ. अशोक कुकडे यांनी सांगितले. सहकारी कायद्यात बदल घडवण्यासाठी केंद्र व राज्याने पुढाकार घ्यावा, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे म्हणाले.