आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणासाठी गडाचा वापर कधीच केला नाही :पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- भगवानगडावर व महंत डॉ. नामदेवशास्त्रींवर आघात झाला तर तो स्वत:वर समजून पुढे या, गडाची वैभवशाली परंपरा जपण्याचे काम सर्वांना करायचे आहे, गडाचा वापर मुंडे घराण्याने राजकारणासाठी केला नाही, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.

विशेष हेलिकॉप्टरने दुपारी त्यांचे भगवानगडावर आगमन झाले. गडाच्या विकासकामांची माहिती, अडीअडचणी यावर त्यांनी महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.