आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य परिवहन महामंडळ देणार प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राज्यपरिवहन महामंडळाच्या वतीने आपली प्रतिमा उंचावण्यासाठी सौजन्यपूर्ण सप्ताह राबवून प्रवाशांना आकर्षित करण्याबरोबरच उत्पन्न वाढीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी चालक, वाहक, वाहतूक िनयंत्रक, पर्यवेक्षक, आगारप्रमुखांना देहबोलीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
चालू आर्थिक वर्षात चार वेळा सौजन्यपूर्ण सप्ताह राबवण्यात येणार आहे. ते १३ जून, २१ ते सप्टेंबर, २१ ते २७ डिसेंबर आणि २१ ते २७ मार्च २०१६ या कालावधीत हे सप्ताह आयोजित केले जाणार आहेत. ठरावीक काळात असे सप्ताह राबवण्यात येत असले तरी कर्मचाऱ्यांत प्रवाशांविषयी कायमस्वरूपी सकारात्मक मानसिकता बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सौजन्यपूर्ण वागणूक-मानसिकता बदल हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
परिवहन महामंडळाचे ९५ टक्के उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून येत असल्याने प्रवासी हे महामंडळाचे दैवत असल्याची जाणीव कर्मचाऱ्यांना पुन्हा करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यापासून ते चपराशापर्यंत सर्वच जण प्रवाशांना सन्मान, सौजन्य आणि आदर देण्याचा बाणा अंगी रुजवणार आहेत.
एसटीच्या विविध कार्यालयांत लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, प्रवासी आदी अनेक कामांिनमित्त येतात. तसेच ईमेल, पत्र आणि फोनद्वारे संपर्क करत असतात. त्यावेळी त्यांना चांगली वागणूक देऊन महामंडळाची प्रतिमा उंचवण्यात येणार आहे. आगार वाहतूक नियंत्रण केंद्रावर सौजन्य सप्ताहाचे फ्लेक्स बोर्ड लावून प्रवाशांचे स्वागत केले जाणार आहे. वाहतूक नियंत्रक ध्वनिक्षेपावरून प्रवाशांचे स्वागत करून त्यांना सुरक्षित प्रवाशांच्या शुभेच्छा देणार आहेत. प्रवाशांनी मागणी केल्यास तक्रार सूचना वही तत्काळ उपलब्ध केली जाणार. चालक, वाहक, वाहतूक िनयंत्रक, पर्यवेक्षक, आगारप्रमुखांना सौजन्याबाबत देहबोली कशी असावी, दूरध्वनीवरील संभाषण कसे असावे आदीविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
एप्रिलमध्ये कोटीवर नफा
^उन्हाळीहंगामाच्या एप्रिल महिन्यात लातूर िवभागाला एक कोटी नऊ लाख ९२ हजारांचा नफा मिळाला आहे. गतवर्षीच्या एप्रिलपेक्षा २४ लाख ४३ हजारांनी त्यात वाढ झाली आहे. मे महिन्याचे आकडे अद्याप उपलब्ध झाले नाहीत. परंतु या महिन्यातही सव्वा कोटीच्यावर फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जी.एम. जगतकर, विभागीय वाहतूक अधिकारी, लातूर
कुंभमेळ्यासाठी ६० बसेस
नाशिकयेथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी लातूरहून ६० बसेस पाठवण्यात येत आहेत. या बसेस २७ ते ३१ ऑगस्ट आणि १३ ते १५ सप्टेंबर कालावधीच्या दोन टप्यांत पाठवण्यात येत आहेत. या बसेस लातूरहून प्रवासी नेण्याबरेाबरच नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूकही करणार आहेत. त्यासाठी चालक, वाहकाशिवाय अधिकारी आठ पर्यवेक्षक नाशिकला पाठवण्यात येणार आहेत.