आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport Chairman Over Bus Stand Situation

बसस्थानकात गैरसोयी पाहून महामंडळाचे अध्यक्ष नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कन्नड - महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सोमवारी कन्नड आगारास भेट दिली. या वेळी त्यांनी आगारातील अस्वच्छता, बसगाड्यांची अवस्था तसेच परिसरातील खड्डे व स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेची पाहणी करून कोलमडलेल्या बसगाड्यांच्या वेळापत्रकाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

याप्रसंगी माजी आमदार किशोर पाटील, उदयसिंग राजपूत, शेकनाथ चव्हाण, पंडितराव वाळुंजे, सिद्धार्थ पाटील, आगारप्रमुख संदीप रॉयलवार, प्रादेशिक व्यवस्थापक ए.एन. गोहत्रे आदींची उपस्थिती होती. या वेळी गोरे यांनी प्रवाशांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी अध्यक्षांसमोर गैरसोयींचा पाढाच वाचला. यामध्ये बस वेळेवर व विहित प्लॅटफॉर्मवर न लागणे, परिसरातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गैरसोय अशा अनेक समस्या मांडल्या तसेच प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणीही केली.

प्रवासी शेख अतिक यांनी औरंगाबाद येथून सायंकाळी कन्नडला जाण्यासाठी बस नसल्याने विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. सांयकाळच्या वेळेस विद्यार्थीनी, वृद्धांना चेंगराचेंगरीत जागा मिळत नसल्याने गैरसोय होत असल्याचे सांगितले. त्यामुळे जादा बस सोडण्यात यावी अशी मागणी केली. सिद्धार्थ पाटील यांनी कन्नड ते हिवरखेडा बस सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. विनायकराव पाटील कॉलेज ते बसस्थानक परिसरापर्यंत बस सुरू करावी, असेही सुचवले.