बीड - ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचा कारभार तोट्यातून तोट्यात चालला आहे. महागाईमुळे राज्यातील 57 आगार तोट्यात आहेत. यात मराठवाड्यातील आष्टी, पाटोदा, नांदेड आगारांचा समावेश आहे. त्यामुळे या आगारांना कुलूप लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तोट्यात चालणार्या आगारांची तपासणी करण्यात येत आहे. 82 आगारांची तपासणी झाली असून यातील 57 आगार तोट्यात असल्याची माहिती समोर आली आहे. महामंडळातर्फे उपाययोजनांसाठी मोहीम राबवली जात आहे. यातून आगारांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
तोट्यातील आगार : ठाणे -2, कुर्ला नेहरूनगर, सफाळा, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ, कणकवली, शहापूर, मुरबाड, मनमाड, मालवण, राजापूर, र्शीवर्धन, रोहा, धुळे, मालेगाव, सटाणा, पाटण, महाबळेश्वर, अकोला -1, कोल्हापूर, संभाजीनगर, गारगोटी, अमरावती-2, किनवट, बेंगुर्ला, जव्हार, बोईसर, चिपळूण, कवठेमहांकाळ, अर्नाळा, डहाणू, जामखेड, पारनेर, पाथर्डी, सासवड, पालघर, तारकपूर, इगतपुरी, नांदगाव, पेठ, चोपडा, जळगाव, पाचोरा, राधानगरी, गगनबावडा, महाड, दौंड, दहिवडी, मलकापूर, शिराळा, पाटोदा, आष्टी, नांदेड, भोर, तळेगाव, कोरेगाव या आगारांचा समावेश आहे. या आगारांमधून अधिक उत्पन्न न आल्यास राज्यस्तरावरून तोट्यात असलेली आगार केव्हाही बंद करणाचा निर्णय होऊ शकतो.
अशा होतील अडचणी
आगार बंद झाल्याने पुन्हा वाहतूक व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह निर्माण होतील. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होईल, अशाही समस्या निर्माण होण्याची भीती महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.