आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Transport News In Marathi, Osmanabad, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी बसच्या टपावरील वाहतूक रोखण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - नवरात्रोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने तयारी करण्यात येत असून गतवर्षीपेक्षा अधिक बसची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, बसची संख्या वाढवण्यात आल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत असले तरी नवरात्रोत्सवात गर्दीच्या वेळी नियोजन कोलमडून बसच्या टपावरून प्रवास केला जातो. हा धोकादायक प्रवास रोखण्याचे खरे आव्हान महामंडळासमोर असणार आहे.

नवरात्रोत्सवातील आश्विन पौर्णिमेला महाराष्ट्रातील १५००, तर कर्नाटकाच्या ३०० बस भाविकांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवास २५ सप्टेंबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. आश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर लोहमार्गाशी जोडला गेलेला नसल्याने भाविकांना पूर्णपणे एसटीवर अवलंबून राहावे लागते. परिणामी एसटीवर ताण येतो. आश्विन पौर्णिमेला तर एसटीची कसोटी लागते.

गतवर्षी महामंडळाच्या वतीने खास नवरात्रोत्सवासाठी १२०० बस होत्या. त्यामध्ये या वर्षी ३०० बसने वाढ करण्यात येणार आहे, तर कर्नाटक राज्याच्या गतवर्षीच्या २०० बसच्या तुलनेत या वर्षी ३०० बस कार्यरत असणार आहेत. अशा प्रकारे एसटी महामंडळाकडून आश्विन
पौर्णिमेनिमित्त १८०० बस भाविकांच्या सेवेत सहभागी होणार आहेत.

अशी असणार व्यवस्था
>सोलापूरसाठी बस आगारातून जास्त बस सोडण्यात येणार आहेत.
>नवीन बसस्थानकातून लातूर, उमरग्यासह ग्रामीण भागात बससेवा दिली जाणार आहे.
>जुन्या बसस्थानकातून केवळ उस्मानाबाद आणि बार्शी या मार्गावरील बसफेऱ्या सुरू राहतील.
>पौर्णिमा कालावधीत उमरगा, गुलबर्गा, हुमनाबाद बस पाटोदा, लोहारामार्गे सोडण्यात येतील.
>हेलिपॅडवर बससाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
>कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कर्नाटक राज्याच्या बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.