आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steel Businessman Find To Save Electricity Water

स्टील उद्योजकांनी शोधून काढला वीज, पाणी बचतीचा पर्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मागील२-३ वर्षांपासून दुष्काळातील तीव्र पाणीटंचाईशी सामना केल्यानंतर आता पाणी बचतीवर स्टील कारखानदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ड्रायकूलिंग टॉवर नावाचे तंत्रज्ञान कारखानदारांनी बसवले असून यामुळे पाण्याची ८० टक्के बचत होत आहे. सोबतच हॉट चार्जिंगचा वापर करून एकाच ठिकाणी बिलेट सळई तयार केली जात आहे. परिणामी दगडी कोळसा, वीज, वाहतूक श्रम यावरील खर्च घटला आहे.

जालना नवीन एमआयडीसीत जवळपास ४५ कारखाने आहेत. यात बिलेट तयार करणे त्यापासून सळई तयार करणे अशा दोन प्रक्रिया चालतात. या कारखान्यांसाठी प्रामुख्याने उच्च दाबाची वीज पाण्याची मुबलक आवश्यकता असते. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे स्टील कंपन्यांवर मंदीचे सावट आहे. यातच विजेचे दर पाण्याची गरज याचा मेळ घालत उत्पादन काढण्याची मोठी कसरत कारखानदारांना करावी लागत आहे.

गरज ही शोधाची जननी या उक्तीप्रमाणे येथील उद्योजकांनी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतला. यात पाण्याची ८० टक्के बचत करण्याचा उपाय सापडला. दरम्यान, कुठलाही वेळ घालवता संबंधित उत्पादकांनी कंपनीशी संपर्क करून हे तंत्रज्ञान थेट आपल्या कारखान्यात बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भाग्यलक्ष्मी स्टील प्रा. लि., मेटारोल्स प्रा. लि.व कालिका स्टील प्रा. लि.या तीन कंपन्यामध्ये हे तंत्रज्ञान कार्यरत आहेत.

वाहतूक खर्च वाचला : पूर्वीभंगारपासून बिलेट तयार केल्यानंतर थंड असलेले बिलेट दुसर्‍या ठिकाणी नेले जात. त्याठिकाणी सळई तयार केली जात असे. मात्र, हॉट चार्जिंगमुळे बिलेट सळई एकाच ठिकाणी तयार करता येत आहे. यामुळे वेळ, वाहतुकीचा खर्च बिलेट गरम करून त्यापासून सळई तयार करण्यासाठी लागणारी वीज बचत झाली.

हॉट चार्जिंग प्रक्रिया अशी
प्रथमभंगाराचे वर्गीकरण करून मॅगनेटच्या साह्याने ते इलेक्ट्रिक फर्नेस प्लॅन्टमध्ये आणून टाकले जाते. याठिकाणी उच्च तापमानात (१०००-११०० अंश से.) भंगार वितळवले जाते. त्यानंतर कास्ट मशीनने बाहेर काढून त्याचे बिलेटमध्ये रूपांतर केले जाते. या बिलेटमधून जेव्हा सळई निर्मिती केली जाते, त्याठिकाणी हॉट चार्जिंग केले जाते, म्हणजे बिलेटचे तापमान कमी करून घेतले जाते. त्यानंतर सळईच्या ग्रेडप्रमाणे आकार दिला जातो.

ड्रायकूलिंग टॉवर म्हणजे काय
ड्रायकूलिंग टॉवर हे तंत्रज्ञान पाण्याचे बाष्पीभवन रोखते परिणामी कारखान्यातील प्रक्रियेसाठी कमी पाणी लागते. यामध्ये रेडीएटर बसवलेले असते. उच्च तापमान असलेल्या बिलेटचे सळईत रूपांतर करण्यासाठी प्रथम त्याचे तापमाने कमी करावे लागते. पूर्वी याठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मात्र,आता पाण्याचे काम ड्रायकूलिंग टॉवरमधील रेडीएटर करत आहे. यामुळे पाण्याची मोठी बचत होत असून हा खर्च वाचला आहे.

पाणी बचतीसाठी प्रयत्न
कारखान्यातकमी पाणी विजेवर अधिक उत्पादन कसे काढता येईल, यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. ड्रायकूलिंग टॉवर हे अद्ययावत तंत्रज्ञान यासाठी बसवले आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी बचत गरजेची आहे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. घनश्यामगोयल, संचालक, कालिका स्टील, जालना

खर्च कमी करणे शक्य
ड्रायकूलिंग टॉवर हॉट चार्जिंग प्रक्रियेमुळे स्टील कारखान्यातील उत्पादन खर्च कमी करणे शक्य झाले. यामुळे वेळ, वीज, वाहतूक खर्च श्रम वाचले. शिवाय, पर्यावरण संतुलनासाठी तंत्रज्ञानाची मदत झाली. डी.बी. सोनी, संचालक, मेटारोल्स
प्रा. लि. जालना. गरज शोधाची जननी

बचतीचे गणित असे
पूर्वी सळई निर्मितीसाठी प्रतिटन ४०० लिटर पाणी लागत असत. ड्रायकूलिंग टाॅवरमुळे फक्त ४० लिटर पाणी लागते. तर बिलेटपासून सळई निर्मिती करण्यापूर्वी बिलेटला गरम करावे लागत, यासाठी १५० किलो कोळसा म्हणजे ९०० रुपयांचा खर्च येई. हाॅट चार्जिंगमुळे कोळशाचा वापर घटला. बिलेट एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा वाहतूक खर्च येत असे, हॉट चार्जिंगमुळे एकाच ठिकाणी िबलेट त्यापासून सळई तयार करणे शक्य झाले. यामुळे वाहतूक खर्च, वेळ मनुष्य श्रमाची बचत झाली.

पर्यावरण संतुलनासाठी मदत
हॉटचार्जिंगमुळे दगडी कोळशाचा वापर घटला. परिणामी प्रदूषण घटून पर्यावरण संतुलनासाठी मदत झाली आहे. बिलेट तापवून सळई तयार करण्यासाठी लागणार्‍या प्रतिटन १५० किलो दगडी कोळशाची बचत झाली. दगडी कोळशाऐवजी याठिकाणी विजेचा वापर होत आहे.