आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तके अद्यापही न मिळाल्याने विद्यार्थ्यांत निराशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही क्रमिक पुस्तके मिळाली नसल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. विद्यापीठात एकूण लाख विद्यार्थी असून संपूर्ण राज्यभर हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुक्त विद्यापीठाच्या केंद्रांतर्गत नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर जिल्हे येतात. चार जिल्ह्यांत मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाख १० हजार आहे. बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी.सह छोटे-मोठे २५ अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत घेतले जातात. या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. या शुल्कात अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी विद्यापीठाचीच असते.

पोस्ट,कुरिअर, एसटीची सेवा
यावर्षीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोचवण्यासाठी विद्यापीठातर्फे मे महिन्यात पोस्ट खात्याला प्रतिकिलो ३० रुपये दराने देण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाची पुस्तके देण्यासाठी जे गठ्ठे तयार करण्यात आले त्याचे वजन अडीच किलोपासून पाच किलोपर्यंत होते. पोस्ट खात्याने विद्यापीठात नमूद असलेल्या विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर पुस्तके पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अपूर्ण पत्त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. अखेर पोस्ट खात्याने सर्व पुस्तके विद्यापीठात साभार परत केली. त्यानंतर विद्यापीठाने कुरिअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यातही तीच अडचण आली. आजही अनेक बसस्थानकांवरील पार्सल विभागात रेल्वे विभागाच्या पार्सल विभागात पुस्तके पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यार्थ्यांना अतिरिक्त भुर्दंड
विद्यापीठानेविद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाइन डाऊनलोड करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी त्याचाही प्रयत्न केला. विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत.

ग्रामीण भागात इंटरनेटचे नेटवर्क चांगले नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रयत्न करूनही पुस्तके मिळाली नाहीत. ज्यांनी डाऊनलोड केली त्यांना प्रत्येक विषयाच्या एका पुस्तकासाठी किमान शंभर रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला.

चुकीच्या अर्धवट पत्त्यांमुळे समस्या
^यावर्षी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अॅडमिशन झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे पत्ते, मोबाइल नंबर दिले. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके डाऊनलोड करून घेण्यास सांगितले त्यांच्याकडून शुल्क कमी घेण्यात आले. तेही विद्यार्थी पुस्तके मागत आहेत. आता एसटी डेपोला पुस्तके पाठवून केंद्रांना घेऊन जाण्यास सांगितले आहे. २-४ हजार विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. प्रकाश अतकरे, कुलसचिव,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक