आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत चार बसवर दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उस्मानाबाद शहरात मातंग समाजातील तरुण व महिलांनी बसवर दगडफेक करून चार बसचे 60 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि.6) दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास तुळजापूर रोडवर साठे चौक येथे घडली असून, यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.
सध्या विविध समाजातील नागरिकांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. त्यातच बुधवारी (दि. 6) दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास 25 ते 30 जणांच्या महिला व तरुणांच्या गटाने मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी करत बसवर दगडफेक केली. यामध्ये अण्णाभाऊ साठे चौक, पापनासनगर, सोनाई हॉटेलसमोर आदी ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये तुळजापूर-उस्मानाबाद (बस क्र. एमएच 20 बीएल 491), सोलापूर-उस्मानाबाद (एमएच 40 एल 9754), तुळजापूर-उस्मानाबाद(एमएच 14 बीटी 2390) व एमएच 14 बीटी 1599 या चार बसवर दगडफेक करून 60 हजार रुपयांचे नुकसान केले.
यामध्ये फिर्यादी तथा बसचालक प्रकाश प्रभाकर जानराव (परंडा आगार, रा. वडगाव सि.) यांच्यासह महिला वाहक प्रियंका मल्हारी काक्रंबकर (परंडा ) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी सोमनाथ लक्ष्मण कांबळे, मुकेश रामहरी देडे व खंडू जाधव (सर्व रा. दारफळ) यांच्यासह 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला हेडकॉन्स्टेबल रेखा मंजुळे करत आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे