आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कंपनीच्या विरोधात केजमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता रोको, वाहतूक ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- केज तालुक्यात थकीत वीज  बिलापोटी  वीज कंपनीने कृषिपंपाचे वीज कनेक्शन  तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या विरोधात शुक्रवारी   शेकापच्या नेतृत्वाखाली केज शहरातील शिवाजी चौकात एक तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

केज तालुक्यात वीज कंपनीने  थकीत बिलापोटी  शेतकऱ्यांना बिल भरण्याच्या नोटिसा न देताच कृषिपंपांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.  परिणामी रब्बी हंगाम धोक्यात  सापडला असून  शेतकरी संतप्त झाले आहेत.  

वीज कंपनीने ही मोहीम मागे घेऊन कृषिपंपांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शेकापचे कार्यकर्ते व शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर आले होते. शहरातील शिवाजी चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार अविनाश कांबळे यांना  देण्यात आले. आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे मांजरसुंबा - अंबाजोगाई व कळंब रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...