आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नग्न फोटो काढून उकळले ४ लाख, शाळकरी मुलास केले ब्लॅकमेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलाचे नग्न फोटो काढून फेसबुकवर अपलोड करून ४ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकास सदर बाजार पोलिसांनी अटक केली. शनिवारी रात्री ८.५० वाजता ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ धारीवाल असे आरोपीचे नाव असून न्यायालयाच्या आदेशाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोडठीत ठेवले आहे. दुसरा आरोपी प्रमोद भगत फरार आहे.
शनिवारी घरातून आजोबाच्या कपाटातील ड्रावरमधून ५० हजार व आजीच्या कपाटातून साडेतीन लाख रुपये गायब झाल्याचे समजले. शाळेतून मुलगा घरी आल्यावर त्याच्याशी विचारपूस केली असता त्याने आपबीती सांगितली. मोतीबागेजवळील स्विमिंग पूल येथे आर्यनची (नाव बदलले आहे) अंडरवियर खाली ओढून प्रमोदने मोबाइलमध्ये फोटो काढले होते. त्याला फोटो डिलीट करण्याची विनंती केली. मात्र, त्याने फोटो डिलीट केले नाही. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थने आर्यनला फोन करून पैसे मागितले. पैसे न दिल्यास नग्न फोटो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार पैसे न दिल्यामुळे सिद्धार्थने नग्न फोटो एका मित्राच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केला. त्यामुळे आर्यनने सिद्धार्थच्या घरी जाऊन फोटो डिलीट करण्याची विनंती केली असता त्याने फोटो डिलीट केला. मात्र, बिअरबारचे दुकान टाकण्यासाठी ५ लाखांची मागणी केली होती.

सापळा रचून पकडले
पोलिसांनी एसआरपीएफ जवळील जालना क्रिटीकल हॉस्पिटल येथे सापळा रचला. शनिवारी रात्री आर्यनकडून ५० हजार रुपये घेताना सिद्धार्थला पकडले. पीआय अनिल विभुते, एपीआय मेहेत्रे, पीएसआय जयसिंग परदेशी आदींनी यांनी ही कारवाई केली.