आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबंदकीपुढे छुपी राजकीय मैत्री गौण, कौटुंबिक वैर संपणार नसल्याची मुंडे समर्थकांची भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राज्यात सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपी राजकीय मैत्री केली असली तरी त्या पक्षांची पदे सांभाळणा-या पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण-भावाच्या कौटुंबिक दुष्मनीत मात्र त्यामुळे कोणतीही बाधा येण्याची शक्यता नाही. तसा विश्वास धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनीच व्यक्त केला आहे.

ग्रामीण विकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातील हे कौटुंबिक वैर गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांच्यापासून सुरू आहे. हे वैर एकाच पक्षात राहून अडचणीचे ठरत असल्यामुळेच धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्या पक्षातून ते भाजपविरोधात म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या विरोधात उघडपणे काम करून त्यांना आव्हान देत आले आहेत. गेल्या विधानसभा आिण लोकसभा निवडणुकीत धनंजय यांनी थेट गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात काम केले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यासपीठ हाताशी असल्यामुळेच.

मात्र, राज्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी मदत घेतल्यामुळे दोन्ही पक्ष तडजोडीचे राजकारण सुरू करतील, असे संकेतमिळू लागले आहेत. तसे झाले तर मुंडे भावंडांच्या कौटुंबिक वादाला आपोआपच आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली होती. ती धनंजय मुंडे यांच्या िनकटवर्तीयांनी फेटाळली आहे. मुंडे भावंडातील या भाऊबंदकीपुढे राजकीय मैत्री गौण ठरणार असून दोघांतील संघर्ष सुरूच राहील, असे सांगण्यात येते आहे.
अंतर्गत वादाला िमळाले होते व्यासपीठ
गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांच्या आणि पंकजा व धनंजय यांच्यातील वादाला दोघेही एकमेकांच्या िवरोधी पक्षात असल्यामुळे आयते व्यासपीठ िमळाले होते. त्यामुळे त्या त्या पक्षाच्या कार्यातून त्यांच्या कौटुंबिक िवरोधाला खतपाणीच िमळत होते. मात्र, राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे सूत जुळल्यामुळे त्यांची गोची होईल का, हा प्रश्न उपस्थित केला जात होता.